सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे जिल्हा परिषद पुणे कृषी विभाग यांच्याकडून देण्यात येणारा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) वेळू ता.भोर येथील प्रगतशील शेतकरी महादेव दिनकर घुले तसेच शिवगंगा गुलाब घुले यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यप्रित्यर्थ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कृषी विभाग अधिकारी अनिल देशमुख ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, कृषी विस्तार अधिकारी शिवराज पाटील,विजय कोळी, प्रसाद घुले उपस्थित होते.घुले कुटुंबीयांना कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याने भोर तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
COMMENTS