सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे जिल्हा परिषद पुणे महिला बालकल्याण विभाग यांच्याकडून देण्यात येणारा जिल्हा आदर्श अंगणवाडी मदतनीस पुरस्कार २०२१-२२ अंगणवाडी केंद्र गोकवडी ता.भोर येथील श्रीमती वैजयंता जितेंद्र बांदल यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यप्रित्यर्थ उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महिला बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.बी.गिरासे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी चंद्रकांत वाघमारे,जितेंद्र बांदल,उत्कर्षा बांदल, बाप्पू बांदल,मधुकर बांदल,विलास मांढरे,ईश्वर बांदल, प्रसाद बांदल,पंकज बांदल, ऋषिकेश बांदल, अनिकेत बांदल,अबताब शेख,ओम चव्हाण, सौरभ पवार ,पृथ्वीराज बांदल,सिद्धार्थ बांदल, उपस्थित होते.वैजयंता बांदल यांना जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाल्याने भोर तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.