सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सन २०१० -११ साली सोमेश्वर ग्रामीण पतसंस्था द्वारे बेकायदेशीर सत्तेचाळीस लाखाची कर्जप्रकरणे करुन संस्थेची फसवणुक केले प्रकरणी संस्थेचा तत्कालीन सचीव संपत गंगाराम बनकर याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे . अडीच महिन्यापुर्वी वडगाव निंबाळकर पोलीसानी त्याला अटक केली आहे .
भारतीय दंड सहिता ४०९ ,४२० व ३४ च्या गुन्हयाखाली सचीवाला अटक करणेत आली होती . बारामती येथील जिल्हा न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळल्याने उच्च न्यायालयात जामीन दाखल झाला होता तेथे झालेल्या सुनावणीत सदरची कर्जे पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाने मंजुर केल्याने झाली असल्याने व सचीव हा चेअरमन व संचालक मंडळाच्या आदेशानुसार काम करीत असल्याचा युक्तीवाद ॲड.डॉ उदय वारुंजीकर ,ॲड गणेश आळंदीकर व ॲड .आदीत्य खारकर यानी सादर केला .
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.आर.बोरकर यांचेसमोर झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला .