सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर शहरात पे अँड पार्कचा फंडा नगरपरिषदेने सुरू केला असून १५ मार्च पासून याची अंमलबजावणी सुरू केली असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.परिणामी तालुक्यातून भोर शहरात कामासाठी आलेले नागरिक हैराण झाले आहेत.
भोर शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी व ट्रॅफिक समस्या आटोक्यात या उद्देशाने नगरपालिकेने पे ॲन्ड पार्क ही योजना सुरू केली आहे. शहरात ठीकठिकाणी या योजनेचा वापर सुरू झाला आहे. परंतु योजना राबवत असताना स्थानिक नागरिकांसह कामानिमित्त आलेल्या नागरिकांना वाहन पार्क केल्यानंतर पे रक्कम करून आपल्या वाहनांचा बंदोबस्त कराव लागत आहे. शुल्लक कारणाकरिता एखादा नागरिक जर आपल्या एखाद्या दुकानासमोर थांबला असेल त्याच्याकडून सुद्धा बळजबरीने पे पार्क वसूल केला जात आहे.शहरातील दुकानदारांच्या ग्राहकांकडून किंवा स्थानिक नागरिकांच्या घरासमोर त्या स्थानिक नागरिकांना सुद्धा वाहन लावण्यास परवानगी दिली जात नाही. त्यांच्याकडून सक्तीने पैसे वसुल केले जात आहेत. आपली जागा ,आपलेच घर ,आपलेच दुकान यांचा घरपट्टी कर भरूनही पुन्हा आपल्या जागेतील वाहनांचा पुन्हा पे पार्क द्यायचा यामुळे शहरातील व्यापारी व छोटे मोठे दुकानदारांकडून नगरपरिषदे विषयी नाराजी व्यक्त होत आहे.