सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद, : प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील समता आश्रम शाळेमागील जून्या इरागेशन काॅलनीतील पडीक घरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत रविवारी दूपारी ( दि.१९) आढळून आला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी, पाडेगाव ता. खंडाळा येथील समता आश्रम शाळेमागील भागात एका अनोळखी इसमाने इरिगेशन विभागाच्या पडीक खोलीत मफलरच्या सहाय्याने गळफास घेलेल्या अवस्थेत रविवार दिनांक १९ रोजी दूपारी बाराच्या सुमारास आढळून आला आहे. सदर अनोळखी पुरूष वय अंदाजे 35 ते 45, उंची अंदाजे 5.6 फुट असुन त्याने अंगावर पांढऱ्या रंगाचा हाफ भाह्यांचा शर्ट व डार्क ब्ल्यू कलरची साधी पॅन्ट परिधान केलेली आहे. याबाबतची फिर्याद संतोष डोईफोडे पाटील यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस उपनिरीक्षक गणेश माने याबाबत अधिक तपास करीत आहेत.