वकील ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना बार कौन्सिलचा दणका : वकीली सनद दोन वर्षासाठी रद्द

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मुंबई : प्रतिनिधी
वकील गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने मोठा झटका दिला आहे. बार कौन्सिलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षासाठी सनद रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. 
        सदावर्त यांची सनद रद्द करण्याची याचिका ॲड.सुशिल मंचरकर व माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केली होती.यादव यांच्या प्रकरणात हाय कोर्टाने स्टे दिला तर मंचरकर प्रकरणात सदावर्ते यांची सनद रद्द करणेचा निर्णय महाराष्ट्र ॲन्ड गोवा बार काऊंसीलने दिला.
      मंचरकर तक्रारीवर तीन वकिलांच्या समितीने तपासणी करून गुणरत्न सदावर्ते यांना दोन वर्ष कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाही. अशा स्वरूपाची कारवाई केली आहे. एकूणच गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षासाठी सनद रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. 
      वकिलीचा गणवेश परिधान करून बाहेर सार्वजनिक ठिकाणी जाणे. याचबरोबर गणवेश परिधान केलेला असतानाही गुणरत्न सदावर्ते हे त्या ठिकाणी नृत्य करताना निदर्शनास आले होते. आणि हीच बाब कौन्सिलच्या नियमात बसत नाहीत. हा डान्स वकील गुणरत्न सदावर्ते यांना चांगलाच भोवला असून दोन वर्ष त्यांना कुठल्याही प्रकारची केस लढवता येणार नाहीये.
To Top