सोमेश्वर रिपोर्टर टीम------
खंडाळा : प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षीय मुलीचे अज्ञात इसमाकडून अपहरण झाल्याची तक्रार खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ता. २७ रोजी सायंकाळी साडेपाच सुमारास खंडाळा तालुक्यातील एका गावातील वय १६ वर्षे ६ महिणे असणाऱ्या अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचीतरी फुस लावुन तिला पळवुन नेहले आहे.
त्या मुलीचे वर्णन खालील प्रमाणे उंची चार फूट, अंगात नेसणेस पांढरा हिरवा काळे रंगाचा रेषा असलेला फुल बाह्याचा टी-शर्ट,निळ्या रंगाचे जीन्स, पायात चॉकलेटी रंगाची सिंगल बंधाची चप्पल, कानात नकली टॉप्स, जुन्या जखमेचा डाव्या पायाच्या टाचेला वन म्हणून त्या मुलीच्या वडिलांनी अज्ञात इसमाच्या विरोधात खंडाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून याचा अधिक तपास खंडाळा पोलीस करत आहेत