खंडाळा ! अंदोरीच्या सरपंचावर अविश्वास ठराव : सरपंचाच्या मनमानी कारभाराला वैतागून ११ पैकी ९ सदस्यांची तहसीलदार यांचेकडे धाव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : प्रतिनिधी 
खंडाळा तालुक्याच्या राजकीय पटलावर अग्रगण्य असलेल्या अंदोरी ता. खंडाळा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप सुभाष होळकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायतीच्या ११ पैकी ९ सदस्यांनी खंडाळा तहसिलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या घटनेमुळे अंदोरी गावासह संपुर्ण खंडाळा तालुक्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
         अंदोरी ग्रामपंचायतीची दोन वर्षापुर्वी निवडणूक होऊन सत्ताधारी गटाचे ८ तर विरोधी गटाचे ३ सदस्य निवडुन आले होते. सत्ताधारी गटाने सर्वप्रथम प्रदीप होळकर यांना सरपंच तर सुचेता हाडंबर यांना उपसरपंच पदी विराजमान केले. सत्ताधारी गटामध्ये ठरल्याप्रमाणे उपसरपंच सुचेता हाडंबर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, मात्र सरपंच प्रदीप होळकर हे विविध कारणे देत राजीनामा देण्यास टाळाटाळ करत होते. सत्ताधारी गटाने राजीनाम्याची आग्रही मागणी केल्यानंतर त्यांनी विरोधी गटाशी हातमिळवणी केली.  परंतु गाव कारभार करताना इतर सदस्यांना विचारात घेतले जात नव्हते. जेष्ठ नागरिकांना उध्दट बोलणे, ग्रामनिधी खर्च करताना सदस्याना विचारात न घेणे यासह अन्य मनमानी कारभारास कंटाळून ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.      
         या अविश्वास प्रस्तावावर उपसरपंच सोनाली बोडके, सदस्य सुचेता हाडंबर, सुप्रिया धायगुडे, वैशाली धायगुडे, संध्या खुंटे, नामदेव नरुटे, कैलास भिसे, किसन ननावरे, बाळासो होवाळ या नऊ सदस्यांच्या सह्या आहेत.
     यावेळी शामराव धायगुडे, डॉ. नानासो हाडंबर, नानासो ननावरे, काशिनाथ धायगुडे, मस्कु बोडके, अशोक धायगुडे, धनाजी जाधव, तानाजी ठोंबरे, विश्वास दगडे, वसंत दगडे, नवनाथ ससाणे, संजय जाधव, रविंद्र दगडे, सचिन होळकर, नामदेव ननावरे,  सुरेश नरुटे, तुळशीराम होवाळ, मारूती ननावरे यांसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. 
॥ गाव करील ते राव काय करील ... 
अंदोरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रदीप होळकर यांना एकमताने संधी देण्यात आली होती. मात्र खुर्चीवर बसल्यावर त्यांनी सदस्य अथवा इतर प्रतिष्ठीत ग्रामस्थ यांना डावलून कारभार सुरु ठेवला. राजकारणात आपल्याला कोणीच आडवू शकत नाही असा अहंभाव त्यांच्या मनात निर्माण झाला होता. गावातील सर्वांनाच नगण्य ठरविण्याची त्यांची पध्दत आणि मनमानी कारभार लक्षात घेऊन संपूर्ण गावाने एकत्रीत विचार करुन हा प्रस्ताव दाखल केल्याने गाव करील तो राव काय करील ही म्हण सार्थ असल्याची चर्चा गावात सुरु आहे
To Top