पुरंदर ! नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे बिगुल वाजले : प्रथमच सर्वसामान्य शेतकरी होणार संचालक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर व बारामती तालुका कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचे बिगुल वाजले असून, मतदारयादी निश्चित झाली आहे. दि. २८ एप्रिला मतदान होणार आहे. तर यावर्षी प्रथमच कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य शेतकरी संचालक पदासाठी अर्ज करु शकत असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. सद्या या संस्थेवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. 

        दि. २७ मार्च ते ३ एप्रिल सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत संचालक पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्यात येतील. त्याच दिवशी दुपारी ३ नंतर नामनिर्देशन पत्रांची यादी जाहीर करण्यात येईल. दि.५ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे. दि. ६ एप्रिलला विधीप्राय नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध होणार आहे. दि. ६ एप्रिल ते दि. २० एप्रिल या काळत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत नामनिर्देशन पत्र मागे घेता येतील.  दि. २१ रोजी पात्र उमेदवारांना निषाणी वाटप व अंतीम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यकतेनुसार दि. २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. २९ रोजी मतमोजणी व निकल जाहिर केला जाईल असे पत्र प्रकाश शेलार  जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांनी जाहीर केले आहे.
To Top