सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
होळीच्या सणाच्या दिवशीच वेल्हे तालुक्याच्या मुख्यालया जवळच विसावा हॉटेलमध्ये पाबे गावातील तरूण नवनाथ उर्फ पप्पूशेठ रेणुसे (वय ३८) याचा गावठी पिस्तूलाने गोळ्या झाडून निघृण खुन केला आहे. हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्यानंतर खाली पडलेल्या रेणुसे यांच्यावर धार धार शस्त्र सत्तुर,चाकु,कुकरीने तोंडावर व डोक्यावर वार करून दोनचाकी गाडीने पाबे मार्गे पसार झाले.
ही घटना आज दि.६ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पप्पु रेणुसे हे सकाळी कामानिमित्त वेल्हे येथे आले होते.मित्रांसोबत विसावा हॉटेल जवळ गप्प मारत असताना हल्लेखोरांनी आवाज देवून चहा पिण्याचे बहाण्याने हॉटेलमध्ये नेले.हॉटेल चालकाने त्यांना चहा आणून दिल्यानंतर काही क्षणातच हल्लेखोरांतील एकाने डोक्यावर वार केला आणि दुसऱ्या हल्लेखोरांनी गावठी पिस्तूलाने गोळ्या अंगावर झाडल्या यातच रेणुसे याचा प्राण गेला.
विषेश म्हणजे खुन झालेले ठिकाण पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असतानाही पोलींसाना गुंगारा देत आरोपी खून करून पसार झाले.दुपारी घटना घडल्यानंतर संध्याकाळ पर्यंत पोलीसांना आरोपी पकडण्यात यश आले नव्हते.खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आरेपी हे खुन झालेल्या तरूणाच्याच गावातीलच नातेवाईक असल्याची प्राथमिक माहीती वेल्हे पोलीसांकडून मिळाली आहे.खुन झाल्यानंतर तात्काळ पोलीस घटना घडलेल्या ठिकाणी पोहचले.आणि फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी खानापुर व नसरापुर मार्गे जेवढे रस्ते आहेत त्याठिकाणी नाकाबंदी करण्यात आली अशी माहीती पोलींसाकडून मिळाली.आरोपींचा शोध घेवून पुढील तपास पोलीस करत आहेत.
--------------------------
वेल्हे तालुक्यात जमिनीचे बऱ्याच प्रमाणात गुंतागुंतीचे ,लॅटिगेशन ,फसवणुक व्यवहार काही इस्टेट एजंट व काही जमीन मालकांच्या माध्यमातून घडताना होताना पाहण्यास मिळत आहे, यातूनच वर्चस्ववाद व स्वतःच्या अस्तित्व निर्माण करण्यासाठी, जमिनीवर ताबा मारण्यासाठी जमिनी घेण्यासाठी गुंडागर्दी, ,खून,अपहरण,खंडणी यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.वेल्हे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उग्र रूप धारण करताना दिसत आहे, आगामी काळात गॅंगवार भडकण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.