सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

फलटण ! वाद पाहिला तर होता रस्त्याच्या काही फुटांच्या...! त्यावरून दोन गटात हाणामारी... तलवारीच्या हल्ल्यात एक जण गंभीर ..लोणंद पोलिसांत ५४ जणांवर गुन्हे दाखल

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण तालुक्यातील मिरेवाडी येथील दोन गटात रस्त्याच्या वादातून रविवारी झालेल्या भांडणात परस्पर विरोधी तक्रार लोणंद पोलीसांत दाखल करण्यात आल्या आहेत तर याच पार्श्वभूमीवर एकावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटनेनंतर प्रकरण अधिकच चिघळून मिरेवाडी येथील घराला, गोठ्याला तसेच वाहनांला आग लावून पेटवून देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
         याबाबत लोणंद पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फलटण तालुक्यातील मिरेवाडी येथील फिर्यादी विनोद नामदेव रुपनवर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास मिरेवाडी ता फलटण गावचे हद्दीत जमीन गट नं १० मध्ये फिर्यादीच्या घराचे बांधकाम चालू असताना गावातील आरोपी तुषार नामदेव धुमाळ, विराज नामदेव धुमाळ ,सुनील महादेव धुमाळ ,नामदेव गणपत धुमाळ ,सुनील महादेव धायगुडे, शुभम शरद कोकरे , अक्षय दुर्योधन ठोंबरे, बाळासाहेब जयराम कोकरे , मोहन आण्णा ठोंबरे , दत्तात्रय सोपान धायगुडे , प्रथमेश लक्ष्मण धायगुडे , राहुल बापू कोळपे , सोमनाथ महादेव धायगुडे , अक्षय सुनील धायगुडे , जालिंदर विठ्ठल खरात , विठ्ठल गोविंद खरात , भाऊसो अंकुश कोकरे , भरत जयराम कोकरे , अनिकेत जालिंदर खरात व वैभव बाळासाहेब कोकरे सर्व राहणार मिरेवाडी ता फलटण जि सातारा यांनी बेकायदा जमाव जमवून हातात काठ्या घेऊन तुम्ही येथे घराचे बांधकाम करायचे नाही असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून घराचे नवीन बांधकाम हाताने पाडून नुकसान करून बांधकाम बंद पाडले याचा जाब विचारला असता त्यांनी फिर्यादीस व त्याची पत्नी शीतल, भावजय रुपाली , आई बायडाबाई असे सर्वांना हाताने व लाकडी काठीने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्याची फिर्याद लोणंद पोलीस ठाण्यात दिली आहे.

तर सुनील महादेव धायगुडे रा. मिरेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिरेवाडी येथील थोरात रस्त्याचे असलेल्या जागेवरून नामदेव धुमाळ व विनोद रुपनवर यांच्यात वाद सुरू असताना संतोष कांतीलाल शेळके , निलेश भाऊसो शेळके ,अक्षय सुरेश रुपनवर , शुभम दीपक नरुटे , विशाल सतीश नरुटे , रोहित गणपत रुपनवर , अभिषेक सुरेश रुपनवर , महादेव भारत रुपनवर , किरण ज्ञानेश्वर रुपनवर , शंकर नामदेव रुपनवर ,गौरव शंकर रुपनवर , बाळू दिनकर नरुटे , सतीश दिनकर नरुटे , भागूजी साहेबराव पिसाळ , अभिजित गोरख मोरे , युवराज बाळासो ठोंबरे , इंद्रजीत शेखर नरुटे , अनिल तुकाराम रुपनवर , मयूर संजय रुपनवर, निलेश विठ्ठल रुपनवर , उमेश विठ्ठल रुपनवर आणि प्रीतम अधिक कोरडे सर्व रा मिरेवाडी , कुसुर ता फलटण यांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीच्या शेजारी राहणारे नामदेव गणपत धुमाळ , आशा नामदेव धुमाळ ,सायली नामदेव धुमाळ ,विराज नामदेव धुमाळ , तुषार नामदेव धुमळ तसेंच चालक जय बहादूर बीष्ट यांना हाताने लथाबुक्यांनी तसेच काठीने व रॉडने मारहाण करून त्यांचे राहते घर, पिकअप, स्कुटी, दोन ट्रॅक्टर, धान्य, जनावरांचा गोठा नष्ट करण्याचे उद्देशाने पेटवून जाळून टाकले आहे म्हणून वरील सर्व आरोपीं विरूद्ध तक्रार दिली आहे. 

तर याच भांडणाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र एकनाथ जाधव राहणार कुसुर तालुका फलटण याने दिलेल्या फिर्यादीनुसार मौजे बाळू पाटलाची वाडी ता खंडाळा गावचे हद्दीत थोरात मिस्त्री यांचे फॅब्रिकेसन दुकानासमोर दूपारी तीनच्या सुमारास फिर्यादी जितेंद्र एकनाथ जाधव, अमोल शेळके व अक्षय खताळ असे असताना तेथे टीलु उर्फ तुषार नामदेव धुमाळ, विराज नामदेव धुमाळ, नामदेव गणपत धुमाळ रा मिरेवाडी ता फलटण व इतर अनोळखी ९ लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवून टीलु धुमाळ याने अमोल शेळके हा सकाळी आमच्या व रुपनवर यांचा भांडणात लय मध्ये मध्ये करत होता असे म्हणत त्याचे हातातील तलवारीने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यात वार करून व इतर लोकांनी दंडक्याने व लथाबुक्यांनी पाठीवर पायावर छातीवर व हातावर गंभीर जखमी केले म्हणून वरील सर्व तीन व इतर अनोळखी ९ लोकांविरुद्ध तक्रार दिली आहे.
            घटनास्थळी फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे , सपोनि विशाल वायकर यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच मिरेवाडी येथील सध्या वातावरण तणावपूर्ण असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून लोणंद पोलिसांकडून घटनास्थळी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7050,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : फलटण ! वाद पाहिला तर होता रस्त्याच्या काही फुटांच्या...! त्यावरून दोन गटात हाणामारी... तलवारीच्या हल्ल्यात एक जण गंभीर ..लोणंद पोलिसांत ५४ जणांवर गुन्हे दाखल
फलटण ! वाद पाहिला तर होता रस्त्याच्या काही फुटांच्या...! त्यावरून दोन गटात हाणामारी... तलवारीच्या हल्ल्यात एक जण गंभीर ..लोणंद पोलिसांत ५४ जणांवर गुन्हे दाखल
https://lh3.googleusercontent.com/-QbeInQTvrUE/ZAXb545KxfI/AAAAAAAAVjw/HEA29rLGomYo3gxir3VXBNAJ90ioajGswCNcBGAsYHQ/s1600/1678105570611839-0.png
https://lh3.googleusercontent.com/-QbeInQTvrUE/ZAXb545KxfI/AAAAAAAAVjw/HEA29rLGomYo3gxir3VXBNAJ90ioajGswCNcBGAsYHQ/s72-c/1678105570611839-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/03/blog-post_93.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/03/blog-post_93.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy