सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

मेढा ! ५४ गावांसाठी बोंडारवाडी ग्रामस्थांनी धरणास सहकार्य करावे : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आवाहन


सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
बोंडारवाडी ग्रामस्थांनी ५४ गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी बोंडारवाडी धरणाकरिता अधिकाऱ्यांना सहकार्याची भूमिका ठेवावी असे आवाहन करीत बोंडारवाडी गावचे आधी पुनवर्सन नंतर धरण यासाठी मी बोंडारवाडी ग्रामस्थांबरोबर आहे असे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
             पंचायत समितीच्या सभागृहात बोंडारवाडी धरणा संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते . यावेळी जिल्हाबँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, पं.स. माजी सदस्य विजयराव सुतार , मोहनराव कासुर्डे, हरिभाऊ शेलार, बबन बेलोशे,  निर्मला दुधाने, कविता धनावडे, गिता लोखंडे, शकुंतला भिलारे, राजू जाधव, विलास शिर्के, सागर धनावडे, आदी उपस्थित होते.
          यावेळी बोलताना आ. भोसले म्हणाले उप मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत डॉ . पाटणकर उपस्थित असताना जलसंधारण मधुन बोंडारवाडी धरण बांधण्या संदर्भात सकारात्मक विचार होवुन जलसंधारणाला बोंडारवाडी धरणाचा सर्वे पुर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ७० ते ७५ लाख रुपये सर्वे करण्यासाठी जलसंधारणाला मिळणार आहेत असेही आ. भोसले यांनी सांगीतले.
           ते पुढे म्हणाले कण्हेर धरणा मधुन एमआयडीसी आणि शेती व पिण्यासाठी आपला रिझर्व्ह असणारा पाणीसाठा हा एक टीएमसी पेक्षा जास्त आहे आणि त्याच रिझर्व पाणी साठ्याचे ना. फडणवीस साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्याने आता धरण बांधण्याच्या बाबतीत कोणतीच अडचण येणार नाही. आपण कोणाचेही पाणी काढून घेणार नसून आपल्या हक्काचेच ते पाणी आहे आणि ते पाणी साठविण्यासाठी बोंडारवाडी धरण बांधायचे आहे. ज्यामुळे ५४ गावच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे असे ही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगीतले.
          बोंडारवाड धरणाच्या सर्वेक्षणास आता सुरुवात होणार आहे. धरणाच्या प्रशासकीय व तांत्रीक बाबींना सुरवात होईल. हे धरण आपल्या ५४ गावांच्या साठीच असल्याने बोंडारवाडी ग्रामस्थांनी धरण होण्यासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन करीत आधी पूर्नवसन मग धरण हा कायदाच असल्याने प्रथम पूर्नवसन करण्यासाठी मी ग्रामस्थांच्या बरोबर आहे असेही आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगीतले.
            कै. मोकाशी साहेब हे धरण होण्यासाठी प्रयत्न करीत असताना त्यांचा वाढदिवसा दिनी देहांत झाला . त्याचे स्वप्न बोंडरवाडी धरण बांधुन पूर्ण करुयात असे सांगताना बोंडारवाडी ग्रामस्थांच्या विचाराने लवकरच पुर्नवसन अधिकार्याच्या सोबत बैठक घेवु. तसेच टँकर मुक्त गावे होण्यासाठी आणि शासनाचा टंचाई खर्च वाचण्यासाठी शासनाने बोंडारवाडी धरणास लवकर सुरुवात करावी अशी मागणी यावेळी बोलताना आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगीतले. यावेळी ५४ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. राम शेलार यांनी आभार मानले.


COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7036,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : मेढा ! ५४ गावांसाठी बोंडारवाडी ग्रामस्थांनी धरणास सहकार्य करावे : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आवाहन
मेढा ! ५४ गावांसाठी बोंडारवाडी ग्रामस्थांनी धरणास सहकार्य करावे : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आवाहन
https://lh3.googleusercontent.com/-wyvw5PSptVs/ZAXpKns9cDI/AAAAAAAAVj4/m0jm3SAE5asm-7BIY_PvRmrFTUcQ-QCsQCNcBGAsYHQ/s1600/1678108965100711-0.png
https://lh3.googleusercontent.com/-wyvw5PSptVs/ZAXpKns9cDI/AAAAAAAAVj4/m0jm3SAE5asm-7BIY_PvRmrFTUcQ-QCsQCNcBGAsYHQ/s72-c/1678108965100711-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/03/blog-post_39.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/03/blog-post_39.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy