बारामती ! मिळुनी चौघीजणी....! ..येरे घना.. दिसता मजला सुख चित्र नवे.. रेशमांच्या रेघांनी तसेच बरंच काही...वाणेवाडी येथे साद संवाद ग्रुपचा महिला दिन उत्साहात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 संवाद स्वच्छता ग्रुप वाणेवाडीच्या वतीने ग्रूपचा ७ वा वर्धापन दिन आणि जागतिक महिला दिन वाणेवाडी येथे 
रविवार दि.५ मार्च २०२३ रोजी सातारा येथील 'मिळूनी चौघीजनी'प्रस्तुत ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या कवितांवर आधारित महिलांचे भावविश्व उलगडून दाखवणारा 'शब्दवती शांताई'हा डॉ. अदिति कालमेख, सौ.सविता कारंजकर.शुभांगी मदने, शुभांगी दळवी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात शांता शेळके यांच्या पाऊस, पैठणी,नाळ,हात, चंद्रकळा,झरा अशा सुंदर कविता सादर करण्यात आल्या. त्याचबरोबर त्यांनी रचलेल्या येरे घना, किलबिल किलबिल पक्षी गाती, दिसती मजला सुखचित्र नवे, रेशमांच्या रेघांनी अशा चित्रपट गीतांनी महिलांची मने जिंकली.या कार्यक्रमास महिलांचा अतिशय छान प्रतिसाद मिळाला.तसेच परिसरातील एमपीएससी परीक्षेत उत्तम यश मिळवून मुंबई शहर पोलीस दलात 'पोलीस उपनिरीक्षक'पदी नेमणुक झालेल्या वनिता पिसे-वाघमारे यांचा व पुणे येथे 'विक्रीकर निरीक्षक म्हणून नेमणुक झालेल्या.स्मिता पालखे आणि राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत ४*४०० मी. रिले (धावणे)मधील विजेत्या वडगावनिंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थिनी कु.संध्या ठोंबरे, कु.अनिता ठोंबरे, कु.शिवानी जाधव,कु. ऐश्वर्या यादव कु.प्रगती दरेकर यांचा व त्यांचे पालक तसेच त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री.निलेश दरेकर यांचा कार्यक्रमाच्या सुरूवातीस सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास वाणेवाडी गावातील महिला वर्ग,ज्येष्ठ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.साद संवाद ग्रूपच्या सदस्यांनी कार्यक्रम अतिशय यशस्वीपणे पार पाडून एका वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी वाणेवाडीकरांना दिली.
To Top