पुणे ! जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत....महिलांच्या कर्तृत्वास "तैल बैला" वरून सलाम : डॉ. भिसे आणि टीमची कामगिरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : विजय लकडे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा "तैल बैला" पारंपरिक मार्गाने सर करीत टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी महिलांच्या कर्तुत्वास सलाम करीत केलेली ही साहसी मोहीम स्त्री शक्तीस समर्पित केली. या मोहीमेची सुरवात तैल बैला गाव, ता.मुळशी, जि.पुणे येथून झाली. पाऊण तासांची पदभ्रमंती केल्यावर तैल बैलाच्या खिंडीत पोहोचता येते. आरोहणासाठी सुमारे एक तास लागतो.
पहिला सरळसोट अंगावर येणारा ३० फुटी टप्पा पार केल्यावर ट्रॅवर्स मारून पुढे गेल्यावर कातळात कोरलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. पायरी मार्गाने पुढे गेल्यावर दोन छोट्या गुहा आहेत. दुसऱ्या गुहेनंतर येणारा ३० फुटी कातळ टप्पा गिर्यारोहकांची मानसिक व शारीरिक परीक्षा घेणारा आहे. येथून पुढे छोट्या पायऱ्यांमार्गे पुढे गेल्यावर शिखर गाठता येते.
        शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारी २५० फुटी कठीण चढाई, पाहता क्षणी मनात धडकी भरावी असे तैल बैलाचे रांगडे रूप, चुकीला माफी नाही असे हे ठिकाण अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या सिमा घुले, रेश्मा चव्हाण, राजश्री जाधव पाटील, सिमा माने, अलका पाटील, जान्हवी अनिल, शितल पवार, पुजा पांडे, शिवाजी जाधव, रवि गाडे, दिपक कुमार माखिजा, कार्तिकेष साऊरकर, विशाल चव्हाण आणि डॉ समीर भिसे यांनी मोहीम सुरक्षितपणे फत्ते केली.
To Top