सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
गुळुंचे (ता.पुरंदर )येथील दैनिक सकाळच्या पत्रकार, श्रावणबाळ माता पिता सेवा संघाच्या राज्य समन्वयीका, विशेष कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा पत्रकार संघ व पुरंदर तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या सदस्या, तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा प्रवीण जोशी यांना सन २०२३ चा "जिजाऊ - सावित्री" पुरस्कार जाहीर झाला आहे.
०८ मार्च रोजी सासवड येथे पुरंदर तालुका माध्यमिक महिला शिक्षिका संघ यांच्या वतीने "जागतिक महिला दिन अतिशय आनंददायी व उत्साही वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन पुरंदर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व गौरवशाली कामगिरी करीत असलेल्या कर्तृत्ववान महिला भगिणींचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक भेट देऊन "जिजाऊ-सावित्री” पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
गुळूंचे येथील दैनिक सकाळ या वर्तमानपत्राचे पत्रकार म्हणून गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करिणाऱ्या सौ. श्रद्धा प्रविण जोशी यांना "जिजाऊ-सावित्री पुरस्कार 2023" साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी बुधवार दि. ०८/०३/२०२३ रोजी सायं ठिक- ०४:३० वा. पुरंदर हायस्कुल सासवड याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यत येणार आहे. सौ.जोशी यांना नीरा, गुळूंचे, कर्नलवाडी, पिंपरे व निंबुत या परिसरातून अभिनंदन व पुढील वाटचालीला शुभेच्छा येत आहेत.