पुरंदर ! मुरूमच्या संकेत जगताप यांची गाडी 'राजेशभाऊ केसरी'ची मानकरी : गुळुंचे-कर्नलवाडी येथे बैलगाडा शर्यत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----  
नीरा : प्रतिनिधी
गुळूंचे कर्नलवाडी येथे पठारावर निरेचे उपसरपंच राजेश काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या  'राजेशभाऊ काकडे केसरी' बैलगाडा शर्यतीत सुमारे २१६ बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामधून मुरूमच्या संकेत जगताप यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. 
            यामध्ये पुणे मुंबई सातारा सांगली कोल्हापूर नीरा व सोमेश्वर परिसरातील बैलगाडा मालक सहभागी झाले होते. या झालेल्या शर्यतीत ३५ गट फेरे पार पडून या मधील विजयी गाडा मालक सेमी फायनल साठी पात्र ठरले.
           ६ सेमी फायनल मधून ६ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या. यामधे मुरूम च्या संकेत जगताप पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकवला व रोख रक्कम ७१ हजार  व चांदीच्या गढेचे मानकरी ठरले. द्वितीय क्रमांक सुध्धा संकेत जगताप यांच्याच दुसऱ्या गाडीने पटकावला व रोख रक्कम ५१ हजार आपल्या नावे केली. तर तृतीय क्रमांक निंबुत च्या आदित्य हेमंत काकडे यांच्या गाडीने पटकावला व रोख रक्कम ३१ हजारांचे मानकरी ठरले. चतुर्थ क्रमांकाचे मानकरी रॉयल ग्रुप चे शुभम निगडे व अनुप निगडे गुळूंचे हे ठरले व २१ हजार आपल्या नावे केले.तर पाचव्या स्थानी नवनाथ फाळके(चीलेवडी) व सहाव्या स्थानी बलमा ग्रुप वाई हे  राहिले यांनी अनुक्रमे ११००० व ७००० रू बक्षिसांची लयलूट केली.
                    राजेश भाऊ केसरी या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन उद्योजक हरीश शेट्टी पुणे. म.न.पा नगरसेवक अजय तागडे व गुळूंचे व कर्नलवाडी चे सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.
             बैलगाडा शर्यतीचे आयोजन गणेश वाघमारे रणजित निगडे व विकास कर्नवर यानी केले.यावेळी नीरा सोमेश्वर परिसरातील ग्रामस्थ व बैलगाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top