सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे- सातारा महामार्गाशेजारील किकवी ता.भोर परिसरातील लोहकरेवाडी येथे वीट भट्टीवर राहणाऱ्या कुटुंबाच्या घराचे अवकाळी पावसातील वादळी वाऱ्याने पत्रे उडून जाऊन भिंत कोसळली.यात तीन जण किरकोळ तर दहा वर्षाचा एक चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
भोर तालुक्यात शुक्रवार दि.१४ सकाळपासूनच अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते. सायंकाळच्या वेळी सोसाट्याची वादळी वारे सुटल्याने काही ठिकाणी पाऊस बरसला तर अनेक ठिकाणी वादळी वारे जोरदार होते वादळी वाऱ्यात किकवि गावाशेजारील लोहकरेवाडी येथील वीटभट्टीवर ४ जनांसह राहणाऱ्या राठोड कुटुंबाच्या घराचे पत्रे उडून भिंत कोसळली.घरात आई-वडिलां समवेत रणजीत संजय राठोड राहत होता.त्याच्या पायावर भिंत कोसळल्याने पायाला गंभीर दुखापत झाली आहे .रणजीत यास उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले आहे.