सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
माळेगाव : प्रतिनिधी
माझा भाऊ रणजित तावरे यास मी गाडीवरुन मुली फिरवतो, दारु पितो असे का सांगितले तुझ्याकडे बघुनच घेतो चला रे म्हणत तिघांनी एकाला मारहाण केल्याप्रमाणी माळेगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सौरभ राजेंद्र गायकवाड, रा. माळेगाव कारखाना ता. बारामती जि. पुणे याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी रविराज लक्ष्मण तावरे, चेतन शिवाजी गीरीगोसावी, मनोज मोहन सस्ते सर्व रा. माळेगाव अजिंक्यनगर ता. बारामती जि. पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर हकीकत दि. 12/04/2023 रोजी सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान रविराज लक्ष्मण तावरे, चेतन शिवाजी गीरीगोसावी, मनोज मोहन सस्ते सर्व रा. माळेगाव अजिंक्यनगर ता. बारामती जि. पुणे यांनी आपण माळेगाव येथील काँलेजकडे जावु असे माझ्या गाडीत बसुन मला चाकुचा धाक दाखवुन रविराज लक्ष्मण तावरे याने मला तु माझा भाऊ रणजित तावरे यास मी गाडीवरुन मुली फिरवतो, दारु पितो असे का सांगितले तुझ्याकडे बघुनच घेतो चला रे गाडी खडी क्रेशरच्या बाजुने घेवुन चला असे म्हणुन गाडी खडी क्रेशर जवळ आलेनंतर मला गाडीतुन खाली उतरवले त्यावेळी रविराज तावरे याने हाताने माझ्या तोंडावर चापटी मारल्या त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोन इसमाने शिवीगाळ करुन तेथे पडलेला दगड माझ्या उजव्या पायाच्या नडगीवर जोराने मारुन दुखापत केली म्हणुन माझी रविराज लक्ष्मण तावरे चेतन शिवाजी गीरीगोसावी, मनोज मोहन सस्ते सर्व रा. माळेगाव अजिंक्यनगर ता. बारामती जि. पुणे यांचेविरुध्द तक्रार आहे.