सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील संजय नगर येथे शुक्रवार दि. १४ रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसात नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाडाने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला होता. मात्र तात्काळ नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून पेटणारे झाड विझविले.
मागील आठ दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर गर्मी वाढली होती तर ढगाळ हवामान तयार झाले होते. अवकाळी पावसाचा लपंडाव सुरू होता मात्र शुक्रवार दि.१४ अखेर ढगांच्या गडगडाट तसेच विजांच्या कडकडाटासह सायंकाळच्या वेळी शहरात पाउस बरसला.यावेळी नारळाच्या झाडावर वीज कोसळली.विज कोसळलेल्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर मानव वस्ती होती.घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.