जावली ! करंदोशी गावचे २२ वर्षीय सुपुत्र तेजस मानकर यांना वीरमरण : तालुक्यावर शोककळा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली प्रतिनिधी (धनंजय गोरे)
जावली तालुक्यातील करंदोशी गावचे सुरज लहुराज मानकर वय 22 वर्ष  यांना भटिंडा (पंजाब) येथील छावणीमध्ये झालेल्या गोळीबारात डोक्याला गोळी लागल्याने वीरमरण आले असून त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे 
        पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील लष्करी छावणीमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. देशातील सर्वात मोठी लष्करी छावणी असणाऱ्या भटिंडा छावणीत बुधवारी सकाळी ४;३० वाजता घडलेल्या घटनेत एकूण ४ जवान शहीद झाले. त्यात सुरज मानकर यांना देखील विरमरण आले या घटनेचा पुढील तपास पोलीस व आर्मी ची यंत्रणा करत आहे. 
          शहीद तेजस मानकर यांच्या घराला सैनिकी परंपरा असून त्यांचे वडील सुभेदार लहुराज मानकर (सेवा निवृत्त) तसेच मोठा भाऊ कर्नल म्हणून कार्यरत आहेत.स्थानिक ग्रामस्थांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या संध्याकाळ पर्यंत पार्थिव पुण्यात येण्याची शक्यता असल्याचे सांगितले
To Top