बारामती ! थोपटेवाडी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
कोऱ्हाळे : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोपटेवस्ती येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. 
        जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  सकाळी ठीक आठ वाजता  शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी  व ग्रामस्थांनी डॉ बाबासाहेब याच्या प्रतिमेचे पूजन केले.  विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य संतोष खांडेकर यांनी आंबेडकरांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. संदीप (बापूराव) शिंदे यांनी देखील आंबेडकरांच्या चारित्र्य बदल माहिती सांगितली. तसेच अंगणवाडी सेविका रंजना साळवे यांनी आंबेडकरांच्या विद्यार्थी दशेतील अभ्यास व शिक्षण या बदल मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री गावडे सर यांनी मुलांना मार्गदर्शन करून उपस्थित ग्रामपंचायत सदस्य संतोष खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप (बापूराव)शिंदे , अंगणवाडी सेविका, शिक्षक वर्ग, तसेच गणेश शिंदे, लखन सोनावणे, रोहण तावरे, ओंकार कुंभार इत्यादी उपस्थित होते.
To Top