सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील सुरुर गावच्या यात्रेला लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले होते. हा तमाशा सुरू असताना प्रेक्षकांमध्ये बसलेले दोघे एकमेकांना शिवीगाळ करत हाणामारी करू लागले.यावरून दोघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सुरुर गावची यात्रा असल्याने गावातील भैरवनाथ मंदिराच्या समोर दि.13रोजी सायंकाळी तमाशा होता. त्याच वेळी तमाशा पहाण्यास बसलेल्या प्रेक्षकांमध्ये विजय शशिकांत चव्हाण (वय 35) आणि लक्ष्मण सुदाम चव्हाण(वय 48) या दोघामध्ये शिवीगाळ हाणामारी सुरू झाली. या प्रकरणी त्या दोघांविरुद्ध भुईंज पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई रुपाली शिंदे यांनी गुन्हा दाखल केला असून याचा तपास हवालदार माने हे करत आहेत.
COMMENTS