वाई ! शेंदुरजणे येथे पत्नी माहेरी गेल्याच्या नैराश्यातून एकाची गळफास घेत आत्महत्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी 
वाई तालुक्यातील शेंदुरजणे गावातील आनंदा कोंडीबा गायकवाड वय वर्षे 34 यांची पत्नी माहेरी गेल्यान त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं होतं. त्यामुळे ते घरात सतत तणावाखाली वावरत होते. ते वाईच्या एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला होते मात्र गेल्या पाच-सहा दिवसापासून कामाला दांडी मारून घरातच झोपून दिवस काढत होते. आई वडील घर मालकाच्या शेतात कांदा काढण्यासाठी गेले असता संधीचा फायदा घेऊन टोकाचं पाऊल उचलत त्यांनी घरातील पत्र्याच्या अँगल ला ओढणीच्या साह्यान गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. आठवड्यात दुसरी आत्महत्या झाल्यान गावात खळबळ उडालीय. कोंडीबा गणपत गायकवाड वय वर्ष 67 यांनी घटनेची माहिती वाई पोलिसात दिली आहे याचा अधिक तपास वाई पोलीस करत आहेत.
To Top