सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
मध्यधुंद पोलिसाने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त वडगाव निंबाळकर येथे बारामती-निरा रस्त्यावर होळ चौकात लावण्यात आलेले बॅनर फाडले. शुक्रवारी (ता. १४) रोजी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला.
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी भालचंद्र साळुंखे असे या पोलिसाचे नाव असून आकाश संजय साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथिल होळ चौकात विश्वरत्न डाॅ. बाबाासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंती निमित्त बॅनर लावण्यात आले होते. साळुंखे यांनी या बॅनरकडे पाहत शिव्या दगड मारले. त्यावेळी ते दारु पिलेल्या अवस्थेत होते. दगड मारुन बॅनर का फाडला अशी विचारणा केली असता त्यांनी शिविगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान शुक्रवार ता. १४ येथिल भैरवनाथ यात्रा असल्यामुळे दिवसभर तणावाचे वातावरण होते या घटनेची माहिती मिळतात उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे घटनास्थळी दाखल झाले. साळुंखे याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली तक्रारदाराचे म्हणणे ऐकून गुन्हा नोंदविण्यात आला संबंधित पोलिसावर निलंबनाबाबत योग्य ती कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत दक्षता घेतली होती.
----------------------------