सोमेश्वर रिपोर्टर टीम---
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
शाहू, फुले, आंबेडकर वाचणारा माणूस कुणाचाही भक्त किंवा गुलाम होऊ शकत नाही. हजारो वर्षांचे महिलांचे, बहुजनांचे शोषण या महापुरुषांच्या विचाराने संपले. संविधानाने सगळ्यांना राजापासून रंकापर्यंत समान अधिकार दिले, असे मत इतिहास अभ्यासक प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले
करंजे (ता. बारामती) येथील पंचक्रोशी भीमरत्न बौद्ध युवक संस्था यांच्या वतीने महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सभापती प्रमोद काकडे, सरपंच जया गायकवाड, ऍड. हेमंत गायकवाड, डॉ. विद्यानंद भिलारे, डॉ. राहुल शिंगटे, एस एस गायकवाड, प्रकाश हुंबरे, प्रसाद सोनवणे, सोमनाथ सुतार, अनिल हुंबरे, दत्ता गायकवाड, संतोष हुंबरे उपस्थित होते.
बुद्ध म्हणाले माणसात जात नाही. जात मानसिक, काल्पनिक आहे आभासी आहे तोच तुकारामांचा विचार भेदाभेद भ्रम अमंगळ, महाराजांनी सैन्यात सगळ्या जाती होत्या, चटणी भाकर खाऊन गावागावांत यातून लोक पुढ आले. जातीभेद नव्हता. ते घराण्याचा नातीच धर्माचा नव्हतं. रयतेची होत. महात्मा त्यांना कुळवाडी भूषण म्हणतात. अठरा पगडा जातीचे भूषण म्हणतात. पहिल्या शिवजयंती त्यांनी सुरू केली. बाबासाहेबांनी शास्त्र शुद्ध विश्लेषण जातीव्यवस्था केलं. सनातनी धर्म व्यवसथा नाकारल्याशिबाय समता येणार नाही. शिकलेले लोक डॉक्टर वकील सुद्धा ज्योतिश पत्रिका नव्हे व्यसनी आहे का पहा
सगळे जय भवानी जय शिवाजी म्हणतात. ही घोषणा भारतात पहिल्यांदा डॉ बाबासाहेबांनी सुरू केली.
राजकीय नव्हे आर्थिक समानता नाही सामाजिक समानता अली नाही. तोपर्यंत आरक्षण आवश्यक. आता आरक्षण बंद करा म्हणतात. गुणवत्तेला संधी द्या. गुणवत्ता कुणाची मक्तेदारी नाही. अँटिलियाचं वीजबिल 40 लाख आहे, आदिवासी उपेक्षित वंचित याना light नाही. आंबनीने वाढदिवसाला विमान भेट दिलं. दुसरीकडे अडीचशे ची साडी देत येत नाही वाढदिवस माहिती नसतो. 90 टक्केनी पाहिलं नाही. नेहरू बाबासाहेब वैचारिक मतभेद होते पण नेहरू यांनी अष्टपैलू bhugyani जबाबदारी बाबासाहेब यांच्याकडे दिलि. संविधानान सर्वांना दिलं. आम्ही भारतीय लोक. संविधान कुठल्या धर्मविरोधी नाही कुठल्या धर्माचा अनुनयनकरणार नाही. हजातो वर्षांचं महिलांचं शोषण संविधानात संपले.
बुवासाहेब हुंबरे यांनी प्रस्ताविक केले सूत्रसंचालन गौतम चाबुकस्वार यांनी बकेले आभार भाऊसाहेब हुंबरे यांनी मानले.