भोर ! 'लेक असावी तर अशी' चित्रपटामुळे जुन्या आठवणींना उजाळा : मा. मंत्री अनंतराव थोपटे : 'माहेरच्या साडी' नंतर विजय कोंडके यांच्या नवीन चित्रपटाचा शुभारंभ संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
 मराठी  चित्रपट सृष्टीत एकेकाळचा राजा असणारे भोर तालुक्यातील इंगवली ता.भोर गावचे सुपुत्र दादा कोंडके यांच्या माध्यमातून तालुक्याचे नावलौकिक आहे.त्यांचेच पुतणे विजय कोंडके यांनी पुन्हा एकदा चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवून लेख असावी तर अशी या चित्रपटाचा दिग्दर्शन केले असल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी केले.
           भोर तालुक्यातील इंगवली येथील दादा कोंडके स्टुडिओ येथे सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक,निर्माता विजय कोंडके दिग्दर्शित " लेक  असावी तर अशी " या मराठी चित्रपटाचा मुहूर्त शुभारंभ शनिवार दि.१५ माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी शूटिंग मुहूर्त शुभारंभ कार्यक्रमासाठी चित्रपटातील प्रमुख कलाकार शुभांगी गोखले ,यतीन कारेकर,  प्राजक्ता हणमघर,गार्गी दातार दादा पासलकर,केशव पवळे,बाबुषेठ गुजराथी तसेच कलाकारांसह सहकलाकार,चित्रपट क्षेत्रातील इतर मान्यवर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.१९९१ नंतर विजय कोंडके पुन्हा एकदा मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून माहेरची साडी प्रमाणे हा चित्रपट सर्वांना आवडेल असा विश्वास दिग्दर्शक विजय कोंडके यांनी व्यक्त केला.माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विक्रम शिंदे यांनी केले.

To Top