bhor news ! हीर्डोस मावळातील साळव येथे भीषण आग : भोर तालुक्यातील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील नीरा- देवघर धरणा जवळील मौजे साळव येथे मंगळवार दि .११ भीषण आग लागली.आगीचे  कारण अस्पष्ट असून आगीमध्ये जनावरांचा चारा पूर्णपणे जळून खाक झाला. दुपारी ११ ते १२ च्या दरम्यान येथील ग्रामस्थांनी वनवा लागल्याचे पाहिले असता तात्काळ भोर अग्निशमन दलास कळविले.अग्निशमन दल येईपर्यंत पाण्याची कमतरता असताना देखील तेथील महिला व मुलांनी घरातील वापरण्यासाठी साठवून ठेवलेल्या पाण्याने आग विझावण्याचा प्रयत्न केला.मात्र पर्यंत आग घराजवळ आली होती.घरातील पुरुष आठवडे बाजारासाठी भोर येथे गेले असल्यामुळे घरामध्ये लहान मुले व महिला होत्या त्यामुळे त्यांना आग विझवणे शक्य झाले नाही.साधारण दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान अग्नीशमन दल आल्यानंतर आग विझवण्यात यश आले.                                                भीषण आगी मध्ये मारुती गोविंद साळेकर ,बाळू कोंडीबा साळेकर यांचा ५०० पेंढा व इतर जनावरांचा चारा जळून खाक झाला.आग आटोक्यात आली नसती तर जवळ जवळ ५ ते ६ घरे आगीमध्ये जळून खाक झाली असती असे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले.लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचा  पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी करित आहेत.

To Top