पुरंदर ! नीरेत महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम---- 
नीरा : प्रतिनिधी
नीरा ( ता.पुरंदर) येथे सत्यशोधक  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मंगळवारी ( दि.११) उत्साहात साजरी करण्यात आली. नीरा ग्रामपंचायत, समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, म.फुले यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूकीसह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.          
       सत्यशोधक  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त नीरा ग्रामपंचायतमध्ये   मंगळवारी ( दि.११) सकाळी साडेदहा वाजता सरपंच तेजश्री काकडे , उपसरपंच राजेश काकडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
 समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने नीरा येथील विठ्ठल मंदीरात मंगळवारी (दि.११) दुपारी तीन वाजता म.फुलेंच्या  प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर भजन, लहान मुलांचे भाषणे तसेच भव्य मिरवणूकीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
       यावेळी अनिल चव्हाण, संदीप धायगुडे, अनंता शिंदे, वैशाली काळे, हरीभाऊ कुदळे, अँड.आदेश गिरमे,राजेंद्र भास्कर, शामराजे कुंभार, बाळासाहेब गार्डी, सुनिल चव्हाण, अरूण फरांदे, सुरेश कोरडे, योगेंद्र माने तसेच समस्त माळी समाज बांधव उपस्थित होते.
To Top