खंडाळा ! वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल : लोणंद पोलिसांची कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील लोणंद नजीक एमआयडीसी येथे हॉटेल अन्नपूर्णा लॉजवर लोणंद पोलिसांनी छापा टाकत वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
            याबाबत अनिकेत दिलीप क्षीरसागर व सागर कुदळे दिघेही रा. लोणंद यांना पोलिसांनी अटक केली आहे. सविस्तर माहिती अशी, 
 दि. 11/04/2023 रोजी लोणंद ते शिरवळ रोडवरील एमआयडीसी परिसरातील हॉटेल अन्नपूर्णा लॉजिंग येथे सायंकाळी पावणेसहा सुमारास  आरोपी अनिकेत दिलीप क्षीरसागर वय 26 वर्षे रा. माळआळी लोणंद ता. खंडाळा व लॉज चालवणारा सागर कुदळे रा.लोणंद ता. खंडाळा यांनी हिला वेश्या व्यवसाया प्रवृत्त करून बोगस गिराईक यांना वेश्या गमना करिता मिळवुन देऊन महिलांना वेश्या गमनासाठी उद्युक्त करून वेश्याव्यवसायाच्या कमाईतील मिळकतीवर अवलंबून राहून वेश्या व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले.
To Top