सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
खंडोबाचीवाडी ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण १२६ बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये मुरूम येथील ओंकार शिंगटे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवत ६१ हजार रुपयांचे बक्षीस जिंकले.
सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या शर्यतीमध्ये एकूण २६ गटफेरे पार पडले त्यामध्ये प्रथम क्रमांकाने आलेल्या गाडी मालकांचा सेमी फायनल मध्ये प्रवेश झाला
सेमी फायनल मध्ये एकूण सहा गट फेऱ्या पार पडल्या त्यामध्ये प्रथम क्रमांकाने येऊन त्या गाडीने फायनल ला आपली दावेदारी दाखल केली.
सायंकाळी सहा वाजता फायनल चा फेरा पार पडून प्रथम क्रमांक ओंकार शिंगटे मुरूम यांचा येऊन रोख रक्कम ६१ हजार व मानाची ढाल पटकावली.द्वितीय क्रमांक खंडोबाची वाडी येथील प्रतीक सावंत ने रोख रक्कम ५१ हजार व मानाचे डाल आपल्या नावावर केली तृतीय क्रमांक ज्योतिर्लिंग प्रसन्न यांनी तर चतुर्थ व पाचवा क्रमांक काळभैरवनाथ प्रसन्न सोनाई गार्डन यांनी पटकावला व अनुक्रमे ४१ हजार, ३१ हजार व २१ हजारांचे मानकरी ठरले.
या शर्यतीचे नियोजन खंडोबाची वाडी ग्रामस्थ व भैरवनाथ यात्रा कमिटी व तरुण मंडळ यांनी पहिल्यांदाच करून अगदी उत्तम नियोजन केले .
बारामती पुणे कोरेगाव व स्थानिक भागातील बैलगाडा मालकांनी या शर्यतीमध्ये आपला सहभाग नोंदवला. आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील कलाकारांनी या शर्यतीमध्ये सहभागी होऊन बैलगाडा मालक व चालक आणि प्रेक्षकांचा उत्साह आणखीनच द्विगुणीत केला.