बारामती ! सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय व केडीएन इन्फोटेक कंपनी यांच्यात सामंजस्य करार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय आणि KDN Infotech Pvt. Ltd. यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाला
या सामंजस्य करारामध्ये विद्यार्थ्यांना विविध कोर्सेसचे ट्रेनिंग व नोकरीच्या संधीच्या बाबतीत जागतिक मानांकांशी जुळवून घेण्यासाठी हा करार अत्यंत उपयुक्त आहे.
        नाविन्यपूर्णतेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे आणि त्यांना स्पर्धेसाठी तयार करणे असे एकत्रितपणे उद्दिष्ट या कराराद्वारे पार पाडण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
सदर कराराच्या वेळी संचालक प्रतिनिधी आनंदकुमार होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. सूर्यवंशी डिप्लोमा महाविद्यालयाचे प्राचार्य  एस. के. हजारे संस्थेचे लेखापाल श्री. सागर सूर्यवंशी व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
        या सामंजस्य करारावर महाविद्यालयाचे प्राचार्य, संगणकशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका आर. डी. शेळके व KDM Infotech Pvt. Ltd. चे संचालक  विनोद जगताप यांनी स्वाक्षरी केली. या सामंजस्य कराराबद्दल श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप उपाध्यक्षा प्रणिता खोमणे सर्व संचालक मंडळ व संस्थेचे सचिव भारत खोमणे यांनी अभिनंदन केले.
To Top