Bhor news ! संतोष म्हस्के ! बसरापूर नदीकिनारी पर्यटकांचा हुक्का पार्टीचा अड्डा : पोलिस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष-स्थानिकांना अरेरावीची भाषा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम---------
भोर : प्रतिनिधी
 भोर शहराच्या नजीक असणाऱ्या येसाजी कंक जलाशयाच्या पश्चिमेकडील बसरापूर ता.भोर नदीकिनारी पर्यटकांचा पर्यटनासाठी वावर वाढला असून याच ठिकाणी परदेशी पर्यटक मुक्कामी थांबून हुक्का पार्टी करीत असतानाचे समोर आले आहे. यामुळे बसरापूर नदीकिनारा हुक्का पार्ट्यांचा अड्डा बनल्याचे दिसून येत आहे.
         येसाजी कंक जलाशयाच्या म्हणजेच वेळवंडी नदी संवर्धन किनारी वसलेल्या आदर्श बसरापूर गावाला स्वच्छतेमुळे वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. गावचा नदी किनारा स्वच्छ किनारा आणि सनशाइन पॉईंट म्हणून         ( उगवता, मावळता सुर्य पाहण्यासाठी) प्रसिद्ध आहे.या पर्यटन स्थळावर पर्यटक ,स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर फिरण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी येत असतात.मात्र मौजमजेच्या नावाखाली सामाजिक भान विसरून गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे.नदीकिनारी रात्री उशिरा येणे, धूम्रपान मद्यपान करणे, तसेच मोठ्या आवाजात स्पीकर लावून मध्य धुंद अवस्थेत नाचणे ,ओरडणे अशा प्रकारचे कृत्य प्रकार सध्या चालू आहेत.याकडे भोर पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.स्थानिक नागरिक तसेच गावचे पोलीस पाटील यांनी आशा काही घटना निदर्शनास आल्यास भोर पोलीस स्टेशन येथे त्वरित कळवावे. मध्य धुंद होऊन पार्टी करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल असे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी सांगितले.
----------------------
पर्यटकांची अरेरावी वाढती
पहाटेच्या वेळी पाण्याच्या मोटर संदर्भात नदीकिनारी गेलो असता तिथे परदेशी नागरिक विचित्र अवस्थेत हुक्का पार्टी करताना आढळले. संबंधितांना रोखून विचारणा केली असता त्यांनी अर्वाच्य भाषेत उत्तर देऊन पलायन केले. असे तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र झांजले यांनी सांगितले.


To Top