सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मोरगाव : प्रतिनिधी
अष्टविनायकातील प्रथम मानाचा गणपती असलेल्या मोरगाव या ठिकाणची ही बातमी आहे. गेली अनेक दिवस राजरोस मोबाईल चक्री जुगार येथे सुरू आहे अशी पोलिसांना माहिती मिळाली. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात याबाबत गु.र.नं. १३५ / २०२३ नुसार नोंद करण्यात आली आहे. मोरगाव मुख्य चौकात गेल्या अनेक वर्ष अवैध बेकायदेशीर व्यवसाय चालतात अशा वरिष्ठांकडे तक्रारी जात होत्या. यानंतर नव्याने पदभार स्वीकारलेल्या प्रभारी अधिकारी यांनी हे व्यवसाय बंद करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.
मोरगाव पोलीस मदत केंद्रापासून हाकेच्या अंतरावर हा गैरव्यवसाय सुरू होता. यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. गावातील अनेक स्थानिक तरुण ऑनलाइन चक्री जुगाराच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झाले काल झालेल्या कारवाईत उच्चशिक्षित सह सुमारे 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चिखली जुगारासाठी वापरण्यात येणारे मोबाईल सह अन्य रोकड मिळून सुमारे एक लाख 35 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय.
--------------
मोरगाव येथील कारवाई बाबत पोलीस पोलीस प्रशासनाने माहिती देणे का ? टाळले.
मोरगाव मुख्य चौकातच पोलीस मदत केंद्राजवळ हा गैरव्यवसाय सुरू होता. कार्यक्षमतेची बदनामी होण्याची भीतीने प्रसिद्धी माध्यमांना पारदर्शक पणे मदत केंद्राकडून टाळण्यात आले. या घटनेतील शासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने फिर्यादी असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने कारवाईबाबत आमच्याकडे माहिती नाही. ही कारवाई डी.वाय.एस.पी ऑफिसने केली आहे यामुळे आपण डी वाय एस पी किंवा पोलीस स्टेशनला चौकशी करा असे उडवा उडवीचे उत्तर देऊन टाळाटाळ करण्यात आली. माहिती तिने टाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा यामध्ये व्यक्तिगत स्वार्थ काय असा समान उपस्थित होतो.