सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अठरा जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर तब्बल शंभर उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
लोणंद कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कृषि पतसंस्था व बहुद्देशीय सह. संस्था गटातून सर्वसाधारण ७ जागांसाठी सर्वाधिक ४५ अर्ज प्राप्त झाले आहेत तर महिलांच्या दोन जागांसाठी ८ उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले असून इतर मागास प्रवर्गाच्या आणि विमुक्त जाती/जमातीच्या प्रत्येकी एका जागेसाठी चार-चार उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर ग्रामपंचायत गटामधून सर्वसाधारणच्या दोन जागांसाठी २१ उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत तर अनुसुचित जाती/जमातीच्या एका जागेसाठी ०४ उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून आर्थिक दुर्बलच्या एका जागेसाठी ३ उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाला आहे. तर व्यापारी गटातून दोन जागांसाठी ६ उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आला असून हमाल गटातून एका जागेसाठी ५ उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. लोणंद कृषि उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी १०० उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दिनांक पाच रोजी प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
आज अर्ज दाखल करण्यात आलेल्यात राष्ट्रवादीसह काँग्रेस व भाजपच्या सेनेच्या उमेदवारांचाही समावेश आहे. एकूण अठरा जागांसाठी शंभर उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले असले तरी अर्ज माघारी नंतरच लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.