वाई ! ओझर्डे येथे एकास उसाने व काठीने जबर मारहाण : भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
शेतातील सामायिक बांधाला लागलेली आग विझवण्यासाठी का आला नाहीस या कारणावरून महम्मद शेख वय ५० रा. ओझर्डे यास शिवीगाळ दमदाटी करून हातातील उसाने मारहाण केल्याची तक्रार भुईंज पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.
             पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि.२ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मौजे ओझर्डे ता. वाई गावच्या हद्दीत माळ नावाच्या शिवारातील फिर्यादी यांचे शेतात जमीन गट ४०० मध्ये शेतातील सामायीक बांधाला लागलेली आग विझवण्यासाठी का आला नाहीस या कारणावरून श्रीकांत संभाजीराव पिसाळ याने शिविगळ व दमदाटी करून हातातील उसाने दोन्ही खांद्यावर मारहाण केली तसेच रविराज संभाजीराव पिसाळ याने हातातील निरगुडीच्या काठीने दोन्ही पायाच्या पिंडऱ्यावर हातावर मारहाण केली तसेच संभाजीराव पिसाळ याने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून फिर्यादी यांनी त्यांच्याविरुद्ध भुईंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे याचा अधिक तपास भुईंज पोलीस स्टेशन करत आहे
To Top