सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
जावळी महाबळेश्वर बाजार समिती निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागांसाठी १२१ अर्ज दाखल झाले असून निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. उमेदवाराची भाऊगर्दी झाल्याने नेत्यांच्या डोक्याला डोकेदुखी वाढली आहे.
५ एप्रिलला अर्जाची छाननी होणार असून ६ ते २० एप्रिल पर्यत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. २१ एप्रिल रोजी चिन्ह वाटप होणार असून २८ एप्रिलला प्रत्यक्ष निवडणूक होऊन २९ रोजी निकल जाहिर होणार आहे. .या संस्थेवर आज पर्यंत तीन आमदारांचा वरदस्त असल्याने त्यांच्याकडून आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी चांगलीच खलबते घडणार आहेत.यामुळे निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
भौगोलिक संरचना विभागलेली असल्यामुळे जावळी - महाबळेश्वर बाजार समितीच्या प्रत्येक निवडणुकीत संचालक पदासाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळते. या बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण 18 संचालक पदासाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये कृषी पत व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून सर्वसाधारण साठी ७ जागांसाठी ५१, महिला साठी २ जागेसाठी ९, इतरमागास साठी १ जागेसाठी ५ आणि विभाभज साठी १ जागेसाठी ६ अर्ज, तर ग्रामपंचायत विभागातून सर्वसाधरण साठी २ जागांसाठी २७, अनुजाती साठी १ जागेसाठी ८ आणि अर्थिक दुर्लभ साठी १ जागेसाठी ५ अर्ज दाखल झाले आहेत.
आडते व्यापारी विभागातून दोन जागांसाठी आठ अर्ज, तर हमाल व तोलारी विभागातून एका जागेसाठी दोन अर्ज असे एकूण 121 अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती जावलीच्या निवडणुकीसाठी एकंदरीत सोसायटी मतदारसंघातून ८८४, ग्रामपंचायत मतदारसंघातून 1330, मतदार अडते व्यापारी मतदारसंघातून 308 व हमाल व तोलारी मतदारसंघातून आठ असे एकूण 2330 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. संस्थेच्या हितासाठी ही निवडणूक शेतकरी मतदारांची अपेक्षा आहे. निवडणूक निरक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी जिवन गलांडे यांच्यासह सहाय्यक निरीक्षक तथा तहसिलदार राजेंद्र पोळ हे यावेळी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब रूपवनवर व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश देशमुख हे काम पहात आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.
तालुक्याची राजकिय स्थिती पाहता बाजार समितीच्या निवडणूकित रंगत येण्याची चिन्हे दिसत आहेत. यात नुकत्याच झालेल्या मेढा येथील कार्यक्रमात तालुक्यातील नेतेमंडळीची उंची मांडण्यात आली. या उंचीचा नेमका काय प्रभाव निवडणुकीत दिसतोय की आरोप प्रत्यारोप विसरून शेतकरी ,सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होतात का हे पाहावे लागेल.
बाजारसमितीला केंद्रबिंदू मानून जावळीच्या राजकारणावर लक्ष बारीक ठेवण्यासाठी नेतेमंडळी यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.यामध्ये वाई महाबळेश्वरच्या नेत्यांची महत्वाची भूमिका असणार आहे.सध्यस्तीतीत बाजारमितीची आर्थिक परिस्थिती पाहता निवडणूक परवडणारी नाही. यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या तारखेपर्यंत तालुक्यातील नेते मंडळींनी एकत्रित येऊन बाजार समिती बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करावेत असाच सर्वसामान्य जनतेतून सूर ऐकायला मिळत आहे.
चौकट : जावळी - महाबळेश्वर बाजार समिती ही नेहमीची वर्षानो वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली आहे. यावेळी मात्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या गटाने स्वतःचे स्वतंत्र पॅनल उभे केल्याने बाजार समितीच्या निवडणुकीत नक्कीच रंगत येणार आहे. यावेळी शिवसेना नक्कीच बाजार समितीमध्ये चंचू प्रवेश करू शकते..यावेळी जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, याच बरोबर तालुका प्रमुख, उपतालुकाप्रमुख तसेच सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती महत्वाची होती..
------------------
जावळी तालुक्यातील अनेक सहकारी संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. तर शिवसेनेने पहिल्यांदा आपले स्वतःचे पॅनल टाकल्याने याची दखल नक्कीच विरोधकांना घ्यावी लागेल. या पुढे संघटना प्रत्येक निवडणूक ताकतीने लढणार आहे.
नितीन आनंदराव गोळे : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख जावळी