पुरंदर ! नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १४७ उमेदवारी अर्ज : सोसायटी मतदारसंघातून सर्वाधिक उमेदवारी अर्ज : पहा उमेदवारांची यादी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम तारखेपर्यंत 147 उमेदवारी अर्ज  दाखल झाले आहेत. सोसायटी मतदारसंघातून सर्वाधिक 103 अर्ज आले आहेत. 
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. आजअखेर एकूण 147 अर्ज दाखल झाले आहेत.
कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदार  मतदार संघातील अकरा जागांसाठी 103 अर्ज आले आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण, महिला, इतर मागासवर्ग, वि.जा. भ.ज. व विशेष मागास प्रवर्ग या घटकांचा समावेश आहे.  ग्रामपंचायत मतदार संघाच्या  चार जागांसाठी 32 अर्ज आले आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती-जमाती, आर्थिक दुर्बल यांचा समावेश आहे. अडते-व्यापारी मतदारसंघातील दोन जागांसाठी  9 तर हमाल-तोलारी मतदारसंघातील एका जागेसाठी 3 अर्ज आले आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व असलेल्या या सोसायटीत यावेळी भाजप-शिंदेसेना ताकदीने उतरत असल्याचे दिसते. त्यामुळे अर्जांची संख्या बऱ्यापैकी जुळली आहे. बारामतीच्या  व पुरंदरच्या ऐकून 127 गावांचा समावेश असलेल्या या सोसायटीच्या निवडणुकीकडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्जाची छाननी 5 एप्रिलला होणार असून  वैध उमेदवारांची अंतिम यादी 6 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  उमेदवारी अर्ज माघारीची 6 ते 20 एप्रिलपर्यंत मुदत आहे. 
----
To Top