सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
गोवेदिगर (ता. वाई) येथे गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत एक कुत्रा मरून पडल्याने दूषित पाणी पिऊन अनेक ग्रामस्थ आजारी पडले आहेत. याबाबत ग्रामसेवकाने अजिबात लक्ष न दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मौजे गोवेदिवर ता. वाई येथे गावच्या पाण्याच्या पिण्याच्या विहिरी मध्ये 4 ते 5 दिवसा पूर्वी कुत्रे पडले होते. ते लक्षात न आल्याने ते मेले आणि त्या पाण्यामध्ये ते पूर्णथा सडले तरी सदर गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही. ग्रामपंचायत गोवेदिवर किंवा ग्रामसेवक गोवेदिगर यांनी त्यांच्या कडे दुर्लक्ष केले. तेच पाणी सर्व गावाने 4 ते 5 दिवस पिले वापरले यामध्ये काही लोक आजारी पडले. पाण्याचा वास येऊ लागला तेव्हा ही गोष्ट निदरर्शनास आली. सदर कुत्रे गावातील काही लोक जमून ते बाहेर काढले. हे करत असताना प्रशासनातील कोणीही तिथे हजर नव्हते. ग्रामपंचयातीतील सदस्याचा ही या गोष्टीटी कडे लक्ष नव्हते.
या गोष्टीची माहिती ग्रामस्थांनी ग्रामसेवकाना दिली असता त्यांनी ती गांभीर्याने न घेता उडवा उडवीची उत्तर दिली. हे झालं आहे ते कोठे ही सांगूनका असे सांगून प्रशासनाला काही सांगू नका मी उद्या येणार आहे तेव्हा आपण पाहू,असे सांगून फोन बंद केला. ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या व आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी गोविदेकर ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच तातडीने अंमलबजावणी केली असून सदर गावामध्ये दोन विहिरी आहेत. यातील दुसऱ्या चांगल्या विहिरीचे पाणी सध्या ग्रामस्थांना पिण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. तर दूषित विहिरीतील पाणी उपसा चालू असून तीन ते चार दिवसानंतर ते पाणी ग्रामस्थांना पूर्ववत उपलब्ध करून देणार आहे.