भोर ! पुणे-सातारा महामार्गावर कापूरव्होळ येथे चार गाडय़ांचा विचित्र अपघात : दोन ट्रक, एक कार आणि एक टेंपो एकमेकांवर आदळले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के  
भोर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कापूरव्होळ येथे सोमवार दि.३ रात्री दहाच्या दरम्यान कापूरहोळ चौकात ४ गाड्यांचा विचित्र अपघात झाला असून अपघातात गाड्यांचे मोठे  नुकसान झाल्याचे वृत्त आहे.किरकोळ दुखापत वगळता जीवितहानी झाली नसल्याचे स्थानिक रहिवासी राम पाचकाळे ,सरपंच पंकज गाडे यांनी सांगितले.                                                               अपघातात पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या दिशेने निघालेले वाहने असून रहदारीमुळे अचानक ब्रेक लावल्याने  रस्त्याकडील उभ्या असणाऱ्या पुढील  वाहनाला वाचविण्यात दुसऱ्या वाहनाला ठोकर दिल्याचे नागरिकांनी सांगितले.यामध्ये दोन ट्रक, एक कार, एक छोटा टेम्पो यांचे नुकसान झाले आहे. .कापूरहोळ चौकातून भोरकडे तसेच बालाजी मंदिर, किल्ले पुरंदर, नारायणपुरकडे जाणारी वाहतूक असल्याने या परिसरात नेहमी अपघात होत असल्याचे  स्थानिकांचे म्हणणे आहे.या निमित्ताने पुन्हा एकदा भुयारी मार्ग उड्डाणपुलाची मागणी चर्चेत आली असून अद्यापही याची स्थानिकांना  प्रतीक्षा आहे.
To Top