भोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाच दिवसात सहाजण बेपत्ता : चार मुली व दोन मुलांचा समावेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ४ तरुण मुली व २ तरूण मुले असे एकूण ६ जण मागील पाच दिवसामध्ये बेपत्ता झाल्याची नोंद भोर पोलीस ठाण्यात झाली आहे. 
        या सहामधील एका मुलीने लग्न करून पोलीस ठाण्यात हजर झाली तर बेपत्ता एका मुलाला शोधून भोर पोलिसांनी घरच्यांच्या ताब्यात दिले आहे. सद्यस्थितीला उर्वरीत ३ तरुण मुली व १ तरुण मुलगा असे एकूण चार जणांचा अद्याप शोध लागला नाही.भोर शहर व शहराच्या परिसरातील ही मुले गायब झाली होती. ही सर्व मुले व मुली १८ ते २२ या वयोगटातील आहेत. सध्या बेपत्ता असलेल्या तीन मुलींपैकी दोन मुलींचे लग्न ठरले होते.यातील एका मुलीचा साखरपुडा झाला होता तर दुसरीचा  कुंकवाचा कार्यक्रम झाला असून लग्नाची तारीख ठरली होती.या मुलींच्या लग्नाची तयारी सुरू होती. यासाठी पालकांचा लाखो रुपये खर्च झाला होता.मात्र मंडपात जाण्याअगोदरच दोन मुलींनी पलायन केल्याची घटना घडली.
To Top