सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
ग्रामीण भागात खुप बुद्धीवादी तरुण आपले बौध्दीक कौशल्य पणाला लावून काम करताना दिसून येत आहे . असाच एक तरुण डॉ. सुरज अशोक सोनवणे पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द सारख्या ग्रामीण भागातून प्राथमिक शिक्षण घेऊन त्यानंतर पुणे विद्यापीठातुन रसायनशास्त्र विषयातून एम. एस्सी. सारखे शिक्षण पूर्ण करून दोन वेळा नेट परीक्षा, सेट परीक्षा, दोन वेळा एम.पी.एस.सी. परीक्षा पासून होऊन राजाराम महाविद्यालय येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाला.
चांगली नोकरी मिळाली म्हणून स्वस्थ न बसता आता रसायनशास्त्र विषयात पी.एच.डी. पदवी प्राप्त करून संशोधनासाठी स्वतःला झोकून दिले दिसतो आहे. अशा तरुणांना प्रोत्साहित करण्याचे काम नेहमीच सुराज सामाजिक संस्था पिंपरे खुर्द येथील ग्रामस्थ करताना दिसतात. संस्थेच्या माध्यमातून या अगोदर एम. पी. एस. सी. पास झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला होता. मात्र या वेळी त्याने संशोधन क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याचे समजल्यानंतर त्याचा सत्कार करून त्याला शाबासकीची थाप देऊन त्याच्या कार्याचा गुण गौरव या वेळी करण्यात आला. व त्याने केलेल्या संशोधनाची माहितीही करून घेतली. "आयोनिक लिक्विड्स इन ऑरगॅनिक ट्रान्सफॉरमेशन" या विषयावर संशोधन करत असताना रासायनिक अभिक्रियेत उत्प्रेरक म्हणून काम करणारे पदार्थ तयार केल्याने कमी वेळेत रासायनिक अभिक्रिया होण्यास मदत होते, उत्पादनात वाढ होते, तसेच सदर उत्प्रेरक पुन्हा पुन्हा किमान ७ ते ८ वेळा वापरता येतो. या संशोधनाचा वापर सध्या औषध निर्माण क्षेत्रात करण्याचा मानस असल्याचे त्याने सांगितले.