सोमेश्वर रिपोर्टर टीम ------
शिरोळ : चंद्रकांत भाट
शिरोळ नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचे सदस्य व बालशिवाजी मंडळाचे सचिव प्रा.अण्णासाहेब माने-गावडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडसभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे होते. निवडीनंतर राजर्षी शाहू विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला तसेच अण्णासाहेब गावडे यांची शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली
राजर्षी शाहू विकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक उत्तम माळी यांनी राजीनामा दिल्याने स्वीकृत नगरसेवकपदी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नेतेमंडळीनी प्रा.अण्णासाहेब माने-गावडे यांना संधी देण्याचे निश्चित केले.
नगरपरिषदेच्या दिनकाररावजी यादव सभागृहात स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी विशेष सभा पार पडली. या सभेत प्रा.अण्णासाहेब माने-गावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सभेचे अध्यक्ष अमरसिंह माने-पाटील यांनी जाहीर केले. या सभेत बोलताना नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले, प्रा.अण्णासाहेब माने-गावडे यांनी शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात आपले आयुष्य खर्ची घातले आहे बालशिवाजी मंडळाच्या माध्यमातून राज्य,राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कब्बडी खेळाडू घडविले आहेत. त्यांच्यामुळे शिरोळ शहराचा नावलौकिक होण्यास खऱ्या अर्थाने मदत झाली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राजर्षी शाहू विकास आघाडीने स्वीकृत नगरसेवक पदाची त्यांना संधी दिली आहे. शहराच्या विकासासाठी मिळालेल्या संधीचे ते सोने करतील.
प्रा.अण्णासाहेब माने-गावडे बोलताना म्हणाले की, सार्वजनिक जीवनात काम करीत असताना शिरोळ शहराने नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीने मला नगरसेवक पद देऊन माझा बहुमान केला. यामुळे शाहू आघाडी बरोबरच संपूर्ण शिरोळ शहराच्या ऋणातून कदापिही उतराई होणार नाही. सर्वांच्या सहकार्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहीन.
दरम्यान, केंद्रीय जल आयोगाचे सेवेतून सेवानिवृत्त झालेले रावसाहेब माने यांचा नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या प्रतीक्षा बागडी यांचा सत्कार उपनगराध्यक्षा श्रीमती जयश्री धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी आशिष चौहान, नगरसेविका सौ कमलाबाई शिंदे,अनिता संकपाळ,सुनीता आरगे, विदुला यादव,करुणा कांबळे,सुरेखा पुजारी,कुमुदिनी कांबळे,नगरसेवक राजेंद्र माने,योगेश पुजारी,तातोबा पाटील,बालशिवाजी मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब माजी सरपंच अर्जुन काळे माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील माजी नगरसेवक एन.वाय. जाधव,प्रा.चंद्रकांत गावडे,सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे,आणासो पुजारी,अमरसिंह शिंदे, विराज यादव, सुरज कांबळे,धनाजी गावडे,दत्तात्रय सावंत,धनाजी पाटील- आनंदराव माने देशमुख एम.एस.माने, अप्पासाहेब पुजारी,दिनकर पाटील,बुरानदिन शेख, अप्पासाहेब कळंत्रे,सुनील बागडी,मिरासाहेब बागडी,जयश्री पाटील दत्तात्रय माने विजयसिंह माने देशमुख अमित उर्फ बंटी संकपाळ सचिन पोतदार नंदू जाधव अशोक गंगधर सुभाष आवळे सुभाष माळी अजय सावंत दिलीप संकपाळ विनायक सावंत राजेंद्र कांबळे सुयोग मोहिते धनाजी जाधव संदीप जाधव यांच्यासह शहरातील नागरिक बाल शिवाजी मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.