बारामती ! दोन गुंठे जागा देतो असे सांगत २ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक : एकावर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
दोन गुंठ्यांचा फ्लॉट देतो असे सांगत एका जणांची २ लाख ६५ हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी एकावर गुन्हा करण्यात आला आहे. 
          नवनाथ सोमनाथ माने हा मोलमजुरी करून आपली उपजीविका करतो बारामती शहरांमध्ये आपल्याला स्वतःला राहण्यासाठी जागा असावी म्हणून त्याने ऑल इंडिया मानवाधिकार संघटनेचे अमीन हंबीर शेख राहणार स्नेह कुंज अपार्टमेंट भिगवन रोड यांना चेक द्वारे ऑनलाईन व रोख स्वरूपात २ लाख ६५ हजार रुपये दोन गुंठे प्लॉट घेण्यासाठी दिले त्यांनी प्लॉटही दाखवला परंतु प्रत्यक्षात तो प्लॉट त्यांनी त्यांना दिला नाही त्यानंतर वेळोवेळी त्यांनी प्लॉट देण्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांना संघटनेची भीती घालण्यात आली पोलिसांनी त्यांना दोन वेळा गरीबाचे पैसे देऊन टाका अशी समज दिली परंतु दोन-तीन महिने होऊन सुद्धा त्यांनी टोलवाटीवी केली नंतर फिर्यादी यांनी त्यांना समक्ष भेटून पैसे देण्याबाबत विनंती केली असता त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून संघटनेची परत धमकी देण्यात आली म्हणून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध  ॲट्रॉसिटी कायद्याच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे .
To Top