सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
पालखी महामार्गावर लोणंद ते निरा दरम्यान रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास रेल्वे पुलावर ट्रक पलटल्याने सुमारे अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती. लोणंद पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून मार्ग वाहतुकीस मोकळा केला.
सदर अपघातत मालट्रकचा ॲक्सेल तुटून मागील चाके निखळून पडली होती. पुलाच्या बरोबर मध्यावरच अपघात झाल्याने दोन्हीकडून वाहतूक बंद होउन वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या होत्या.