शिखर शिंगणापूर ! लोकांनी सरळ चालावं...सरळ वागावं... म्हणून तो चालतोय उलटा : फुरसुंगीतील अवलिया तब्बल १५० किमी उलटे चालत जातो शिखर शिंगणापूरला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
शिखर शिंगणापूर : प्रतिनिधी
फुरसुंगी (ता. हवेली) येथील भाविक बापूराव गुंड (वय ५४) हे फुरसुंगी ते शिंगणापूर अशी उलटे चालत वारी करीत आहेत. ही त्यांची आठवी पायी वारी असून लोकांनी आयुष्यात सरळ चालावे म्हणून मी उलटे चालत एक त्यांना संदेश देत आहे.काल ते रात्री शिखर शिंगणापूर येथे पोहचले. तेंव्हा ते 'सोमेश्वर रिपोर्टर' प्रतिनिधीशी संवाद साधला. 

           गुंड यांच्या या वारीचे लोकांकडून विशेष कौतुक केले जात आहे. तब्बल दीडशे किलोमीटर अंतर ते उलटे चालत पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, या उलटे चालत वारीसाठी ते एकटेच निघाले आहेत. पुढे वाहनांचा अडथळा, रस्त्यावरील खड्डे हे सांगण्यासाठी कुणीही नाही. केवळ एका शिट्टीच्या आधारावर ते आपले  लक्ष्य पूर्ण करत त्यांनी दि १ रोजी रात्री शिखर शिंगणापूर वारी पूर्ण केली. सोमेश्वरनगर ता .बारामती येथील गडकिल्ले ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक दीपक साखरे, adv. नवनाथ भोसले, पत्रकार युवराज खोमणे, अमर होळकर, मिलिंद वायाळ, दीपक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. 

          शिखर शिंगणापूरला त्यांची ही उलटे चालत जाण्याची आठवी वारी आहे.  यांच्या डोक्यावरील टोपीवर विविध सुविचार लिहिले आहेत. प्रवासात मतदान जागृती, वृक्षतोड थांबवा, बेटी बचाओ बेटी. पढाओ, ज्येष्ठांचा-गुरुजनांचा आदर करा, आपली एकता व अखंडता टिकविण्यासाठी एकमेकांना सहकार्य करा, असे अनेक संदेश लिहिले आहेत. यापूर्वीही त्यांनी फुरसुंगी ते दिल्ली तसेच आळंदी ते पंढरपूर ४१ वाऱ्या पूर्ण केल्या आहेत. कोल्हापूर एकवेळा, तर मंत्रालयात विविध विषय घेऊन ते सहावेळा उलटे चालत गेले आहेत.
To Top