जावलीतील जनता माझी सावली ! केलेली विकास कामे बोलुन दाखवायची नसतात : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी 
मी राजकारण शब्दांचे केलं, जनतेला दिलेले शब्द मी पाळले. शब्द देऊन कोणाची कधीच फसवणूक केली नाही. छ. शिवाजी महाराजांच्या घराण्याचा वारसा आहे. आपले पण त्यांच्या घराण्याशी ऋणांनुबंध आहेत. मी जावली तालुक्यातील प्रत्येक गावात, वाडीवस्तीत विकास कामे केली आहेत. मी बोलण्यापेक्षा करून दाखवतो हे जनतेला आता माहीत झाले आहे. केलेली विकास कामे बोलुन दाखवायची नसतात तर माझ्या कामाने तालुक्याचा कायापालट करून दाखवला आहे असे सांगुन बोंडारवाडी धरणा संदर्भात माझ्याबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्यात आला. मात्र मी पहिल्यापासून धरणासाठी आग्रही होतो. येत्या दोन-तीन महिन्यातच धरणाच्या सर्वेला सुरुवात होणार असून बोंडारवाडी धरणामुळे ग्रामस्थांचे कोणतेही नुकसान होऊन देणार नाही. आधी पुनर्वसन मगच धरण होईल मात्र 54 गावांच्या भल्यासाठी धरणाला सहकार्य करावे असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी केले. 
                    आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानदेव रांजणे मित्र समूह व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे मित्र समूह जावली यांच्या वतीने मेढ्यात सत्कार सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुंबरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, माजी जी प सदस्या सौ. अर्चना रांजणे, माजी सभापती रूपाली वारागडे, अरुणा शिर्के, प्रतापगड साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, अॅड शिवाजीराव मर्ढेकर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रेय पवार, माजी नगरसेवक विकास देशपांडे, शशिकांत गुरव , सरपंच राजेंद्र संकपाळ, सागर धनवडे, जयदिप शिंदे, कविता धनावडे, गीता लोखंडे, समिर आतार, अनिल धनवडे, हिंदुराव तरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
         आ. शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले गेली पंधरा वर्षे जावलीकरांनी मला खूप प्रेम दिले. त्या प्रेमाची मी विकास कामांनी उतराई केली आहे. सरकार कोणाचेही असू द्या काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती, वजन व वलय लागतं असे सांगुन आ. भोसले म्हणाले जावली तील रस्त्यांसाठी ९० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून कुडाळ - मेढा - कुसुंबी - बामनोली असा 55 किलोमीटर रस्ता जो कोकणाशी जोडला जाणार आहे. सुमारे साडेतीनशे कोटीचा रस्ता तयार होणार असून पर्यटन वाढीसाठी भविष्यात त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे पर्याटणाला चालना मिळेल. मेढ्याची शहरीकरणाकडे वाटचाल सुरु आहे त्याला त्याचा नक्कीच फायदा होईल असे ही आ . भोसले म्हणाले. 
            आ. शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले पुनवडीचा पूल मे अखेर पर्यत पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या असुन तो मे अखेर वाहतुकीस खुला होईल असे सांगुन जनता माझ्यावर प्रेम करते ही जावलीच्या प्रेमाची सावली माझ्यावर कायम राहणार असून माझ्या विरोधात कोणी उभे राहिले तरी त्या प्रेमाची वाटणी कधीच होणार नाही असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
          यावेळी मुलख मैदानी तोफ वसंतराव मानकुमरे यांनी चौफेर फटकेबाजी करून निशाणा साधला ते म्हणाले बाबांनी मेढ्यात बरीच कामे झाली ती मेढेकरांनी आठवणीत ठेवा नाहीतर नगरपंचायतीच्या इलेक्शनला बांबु लावु नका म्हणजे झाल कारण मेढ्याची लोक वस्ताद आहेत. पण मेढेकरांना आम्हाला मस्का मारावा लागतो असे सांगुन मेढ्याच्या विकासाच्या उपकाराची फेड मेढेकरांनी करणे गरजेचे आहे असे मानकुमरे यानी सांगीतले.
         ते पुढे म्हणाले बोंडारवाडीचा प्रकल्प बाबाच करणार आहेत. कुठला पाटणकर आणि कुणीबी आणा बाबाशिवाय हे धरण होणारच नाही. कोणी कोणाच्या पण नादाला लागु नका असे सांगुन आपण काही नामर्द नाही. तालुक्यात शिंदे साहेब, सदाभाऊ असतील बाबा आहेत आपली माणस आहेत ना. नाही झाल तर आम्ही पण अंदोलने करू , मोर्चे काढु . आम्ही काही केले नाहीच का ? असा प्रश्न मानकुमरे यांनी उपस्थित केला.
        बाबा आता जावलीचे झालेत . जावलीच्या जनतेची सावली आहे पण बाबा आमच्यावर पण प्रेम ठेवा गोरे बाबा म्हणून त्यांच्यावरच प्रेम करून आम्हाला बाजुला ठेवु नका असा चिमचा सौरभ शिंदेंना उद्देशुन मानकुमरे यांनी काढत शशिकांत शिंदेंची हवा आता चालणार नाही असे सांगुन कृषी उत्पन्न बाजार समितीला बांबाच्या नेतृत्वाखाली पॅनल तयार करून निवडणूक लढवु असा इशारा यावेळी वसंतराव मानकुमरे यांनी दिला.
        बाबांना ५० वर्षे झाली त्यातील १५ वर्षे त्यांनी जावली तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी दिली. जावलीचा कायापालट केला. अगदी डोंगरमाथा असो कि वाडीवस्ती असो प्रत्येक गावात तुमच्या माध्यमातुन निधी पोहचला आहे त्यामुळे आमचे पुढील आमदार आहात. तुमच्या पुढ्यात कोणीही उभ राहील तरी त्याला त्याची जागा जनता दाखवेल असा विश्वास मानकुमरे यांनी बोलुन दाखविला. 
        ३० वर्षात सदाभाऊ , शिंदेसाहेब यांच्या बरोबर काम केल असताना बाबा तुमच्या बरोबर १५ वर्ष काम करीत आहे पुढेही करणार आहोत तुम्हाला आम्ही सोडून जाणार नाही काही काळजी करू नका आम्ही तुमच्या सोबत च आहोत. सोडून जाणारे गेलेत असे सांगुन भापजाने बाबांना मंत्री पद द्यावे अन्यथा विचार करावा लागेल कारण आम्ही अजुन या पक्षात नाही असा इशारा यावेळी भाजपच्या नेतृत्वाला वसंतराव मानकुमरे यांनी दिला.
          यावेळी ज्ञानदेव रांजणे यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे महराज साहेबांनी तालुक्यातील एक ही गाव विकासापासून वंचीत ठेवले नसल्याचे सांगुन मागेल त्या गावाला निधी देण्याचे काम केले आहे. त्यामुळे जावलीची जनता ही बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन यावेळी रांजणे यांनी दिले.
       
To Top