सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालक्यातील सुपे येथे सराफाचे दुकान लुटण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी गोळीबार केला. या घटनेतील एका आरोपीला स्वतःच्या जिवाची परवा न करता अतिशय शिताफीने हत्यारासहीत आरोपी पकडण्याची धाडस पोलिस नाईक दत्तात्रय धुमाळ यांनी केली आहे. याबद्दल सराफ असोसिएशनच्या वतीने बक्षीस देऊन जाहीर सत्कार करणयात येणार असल्याची माहिती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी दिली.
पोलिसांच्या आणि सुपे ग्रामस्थ्यांच्या धाडसी कामगिरीला त्रिवार सलाम असून सुपे येथील महालक्ष्मी ज्वेलर्स च्या दरोडा प्रकरणी आरोपीला धाडसाने पकडलेल्या ग्रामस्थ आणि पोलिसांचा तसेच मा. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली २४ तासात तपास लावून आरोपीना पकडणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलिसात उपनिरीक्षक आणि इतर पोलिसांचा बारामती सराफ असोसिएशन च्या वतीने बक्षीस आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत लवकर च जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे सराफ असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.