सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी येतील साई सेवा मल्टीस्पेालिटी हॉस्पिटल अँड आय सी यू यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी अहोरात्र झटनाऱ्या सर्व पोलिस कर्मचारी, पत्रकार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वकील व विविध क्षेत्रात काम करत असणाऱ्या मान्यवरांसाठी आज १ एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उ्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. सदर शिबिरास विविध क्षेत्रातील जवळपास १२० मान्यवर व कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. सदर शिबिरास मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, वाघळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच हेमंत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस महिला सचिव सुचेता साळवे, ॲड अनंत सकुंडे, ॲड..नवनाथ भोसले, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर. पत्रकार संतोष शेंडकर, महेश जगताप, युवराज खोमणे, टाटा ट्रस्ट चे परेश, तसेच सोमेश्वर. वडगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. अशी माहिती हॉस्पिटल चे संचालक डॉ. विद्यानंद भिलारे MD हृदयरोग मधुमेह तज्ञ व डॉ. राहुल शिंगटे यांनी दिली.
सदर शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत करण्यात आल्या. या कामी हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्स डॉ..शुभम शहा अस्थिरोग सर्जन, डॉ.जयश्री भिलारे त्वचारोग तज्ञ, डॉ.. निता शिंगटे, डॉ..चैतन्य झेंडे, डॉ. काजल पवार, डॉ.रमेश पोकळे, डॉ.रजिया मुलाणी यांचे योगदान दिले.
अगदी कमी कालावधी मध्ये माणुसकी धर्म जपत सुरू केलेले हॉस्पिटल आज नावारूपाला आल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. साई सेवा हॉस्पिटल मध्ये सर्व कंपन्याचे कॅशलेस मेडीक्लेम सुविधा उपलब्ध आहेत तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून अंशत मोफत आणि माफक दरात उपचार केले जातात अशी माहिती डॉ शिंगटे यांनी दिली .
पोलिस.पत्रकार.शिक्षक.वकील. हे नेहमीच समाजाच्या नायासाठी झटत असतात अश्या लोकांची सेवा करणे हेच या मोफत आरोग्य शिबिर आयोजनाचे उदिष्ट आहे अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आली.