बारामती ! 'सोमेश्वर'चे मा. अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या जनावरांच्या गोठ्यातील दीड लाखांचा चारा अज्ञात व्यक्तीने पेटवला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत ता बारामती येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या गुरांच्या गोठयातील चारा मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.        
              याबाबत गौरव शहाजीराव काकडे यांनी करंजेपुल पोलीस चौकीला तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हणटले आहे की, मी निंबुत या ठिकाणी पालखी दूध फार्म या नावाने गायांचा दुधाचा फर्म आहे. त्याठिकाणी एका ठिकाणी जनावरांचा २० टन साठा करून ठेवला होता. तो दि ३१ रोजी आग लागून जळून गेला.सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दक्षिण पहाटे ३ वाजता एक पेटता गोळा फेकण्यात आला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे जनावरांचा सर्व चारा जळुन खाक झाला. असे तक्रारीत म्हणटले आहे.
To Top