शिरवळ ! चला हवा येऊद्या..टीमकडून रोहिणी साळुंखे यांनी हाताने बनवलेल्या दागिन्यांचे कौतुक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरवळ : प्रतिनिधी
शिरवळ मधील पोलीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान आलेल्या चला हवा येऊद्या टीम मधील श्रेया बुगडे, भाऊ कदम तसेच माधुरी पवार यांना रोहिणी साळुंखे यांनी हाताने बनवलेले दागिने भेट केले. त्यावेळी या सर्वांनी दागिने बनवून भेट दिल्याबद्दल रोहिणी साळुंखे यांचे खूप कौतुक केले. 
  बाबाबाबाबमाधुरी पवार यांनी कार्यक्रमा दरम्यान नाकात घातलेली अप्सरा नावाची विशेष नथ. या नथीचे खूप कौतुक झाले. ही नथ प्रमुख आकर्षण ठरली. श्रेया बुगडे याना दिलेला हार हा खास वेगळ्या प्रकारे तयार केला होता. तसेच नथ देखील त्यांना खूप आवडली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांना अशाच प्रकारचे अनोखे दागिने घालायला आवडतात, जे वेगळ्या पद्धतीने तयार केलेले असतात. 
भाऊ कदम यांच्या पत्नीसाठी दिलेल्या नथ भाऊ कदम यांना खूप आवडल्या. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी माझ्या पत्नीसाठी असे गिफ्ट प्रथमच घेऊन जात आहे. त्यामुळे त्या खूप खुश होतील.
To Top